-
पु. १ धान्य . २ धान्याच्या समुदायापैकी , कणांपैकी प्रत्येक कण , नग , व्यक्ति . ३ धान्यकणाप्रमाणे असणारे मोत्ये , मणि , बीज , डाळिंबाचे बी इ० . ४ बरफी इ० काच्या ठिकाणी साखर जमून जे कण होतात त्यापैकी प्रत्येक . ५ ( कागद , चामडे इ० काच्या गुळगुळीत पृष्ठभागावर येणारी बारीक कणासारखी फुगोटी , टेंगूळ , नक्षी . खरार्याच्या आकाराच्या एका हत्याराने कातडे उभे , आडवे , किंवा चोहोकडून घासतात ; म्हणजे त्याव्र दाणा उमटतो . - ज्ञाको क २६३ . ६ ( कापड इ० कांच्या गांठीतील ) प्रत्येक नग . ७ उत्कृष्ट व एकेक नगाने विकले जाणार्या आंब्यांपैकी प्रत्येक नग . आम्बे मुरण्यास दाणे शुमार पन्नास . - रा २२ . १०५ . ८ किरमिजी रंगाचा कण . ९ सीताफळाच्या सालीवरील डोळ्यांपैकी प्रत्येक . १० एक प्रकारची जाडी साखर . [ सं . धान्यक - दाणअ - दाणा . तुल० फा . दाना ] ( वाप्र . ) दाणे टाकून कोंबडे झुंजविणे - पदरचे खर्चून मुद्दाम भांडणे लावणे . म्ह ०उतरंडीला नसेना दाणा पण दादला असावा पाटील राणा . सामाशब्द -
-
वि. १ धूर्त ; शहाणा ; चतुर ; दूरदर्शी ; चाणाक्ष . २ ( व्यापक . ) उत्कृष्ट ; गुणवान ; उत्तम ; फार चांगला ( मनुष्य , जनावर ). मुलगा दाणा आहे . पादशाहीस वर्तमान कळले तेव्हां बोलिले की दुस्मान दाणा गेला . - मराचिथोशा ८५ . [ फा . दाना ] दाणावणे - अक्रि . ( घोड्याने ) फार दाणा खाल्यामुळे ( तो ) कांही विकाराने , आजाराने युक्त होणे . [ दाणा ]
-
प . ( ग्राम्य .) मदनछत्र .
-
०गल्ला पु. धान्य ; धान्याचा सांठा , कोठार .
Site Search
Input language: