-
वि. १ ज्याच्या दोन डोळ्यापैकीं एका डोळ्याची शक्ति गेली आहे असा ; एका डोळ्यानें अंधळा ; एकाक्ष ; ' काणीला जसें सोग्याचें काजळ शोभत नाहीं .' - कर्म १ . ३२ . २ तिरव्या डोळ्याचा , चक्रणा ; ज्याला बुबुळें तिरकस केल्याशिवाय दिसत नाहीं . असा . हाच अर्थ विशेष रूढ - प्रचारांत आहे . ' कावळा हा काणा पक्षी आहे .' ३ तिरवा डोळा ( एका डॊळ्यानें , दोहों डोळ्यांनी ). काणा डॊळा , काणे डोळे , असे प्रयोग होतात . ४ ज्या देशांत पाहिजे असलेला जिन्नस वेळेस मिळत नाहीं . किंवा जेथील भाव एकदां स्वत तर एकदां महाग असतात असा देश , शहर खेंडे ज्या देशांत आपण दुष्कम्रादि केल्यामुळें पुन्हा त्या देशांत जावयास आपल्यास लाज वाटते तो देश , शहर खेडें इ . ' डोळा काणा असावा पण मुलुख काणा असुं नये .' ५ एक पेड मोठा व दुसरा बारीक अशा तर्हेनें विणलेला दोर . तसेंच तिडुन वांकडी झालेली खाट , माचा , बाज . ६ तिरकस ; तिर्यक् ; तिरवा ; वक्र ; वांकडा . ' जाईल काणे वाटारे । ' - दावि १५८ . ( सं . काण एकाक्ष का . काण ) म्ह० १ काणा कैपती अंधळा हिकमती २ कण्या डोळ्यानीं पाहणें = कटाक्ष मारणेम . ३ क्वचित् काणा भदेत्याधु = काणा किंवा एका डोळ्यानें अंधळा मनुष्य प्राय ; सुस्वभावी नसतो बहुतकरुन लबाड असतो . अंधळ्यांत काणा राजा .
-
वि. एकाक्ष , चकणा , डुचका , तिखा , तिरळा , वक्रद्दष्टीचा .
-
काण्या डोळ्यानें पाहाणें
-
नेत्रकटाक्ष मारणें
Site Search
Input language: